‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून…’; नाना पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ
भंडारा | राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) अनेक ठिकाणी पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नाना पटोलेंच्या आरोपानंतर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
महाविकास आघाडीला बाजूला सारत भंडारा जिल्हा परिषदेवर भाजप (BJP) व काँग्रेसने (Congress) हातमिळवणी केली. काँग्रेस व भाजपने एकत्र येत काँग्रेसने परिषदेचं अध्यक्षपद तर भाजपने उपाध्यक्षपद मिळवलं. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी पाठीत खंजीर खुपसला त्यामुळे आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला, असं नाना पटोले म्हणाले.
राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केलेली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा देखील केली आहे. या चर्चेनंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक पातळीवर भाजपशी युती केल्याचं दिसलं आहे, असं सांगत नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, नाना पटोलेंच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील खदखद बाहेर पडली आहे. नाना पटोलेंच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया येणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
थोडक्यात बातम्या-
“राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं”
‘…तर लोकांनी शरद पवारांना डोक्यावर घेतलं असतं’, निलेश राणेंची बोचरी टीका
“शरद पवार भाजपला घाबरतात, एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते”
“शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिला नाही”
प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन
Comments are closed.