पुणे महाराष्ट्र

“राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार”

अहमदनगर | राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार आहे. या सरकारनं प्रथम शेतकर्‍यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय, असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.

संगमनेर येथे अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्यावतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य असणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी नाना पटोले बोलत होते.

मी विधानसभा अध्यक्ष या नात्याने जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करेल. जनतेची कामे सरकारकडून करुन घेण्यासाठी मी सरकारलाही धारेवर धरेल, असं नान पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मागील 5 वर्षांमध्ये आरक्षणासाठी विविध समाजाच्यावतीने आंदोलनं करण्यात आली होती. त्यामुळे 2021 मध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक ठराव विधानसभेनं केलाय, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या