बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यातील वातावरण भाजपकडून गढुळ केलं जात आहे”

मुंबई | अमरावती येथे घडलेली हिंसाचाराची घटना आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी नाना पटोले रविवारी अंबरनाथ येथे होते. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अंबरनाथ नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा इशारा दिला आणि सोबतच भाजपवर देखील हल्लाबोल केला.

आम्ही जनतेला शांत राहण्याचं आवाहन केलं आणि महाराष्ट्र शांत झाला. पण अमरावती येथे जो काही प्रकार घडला त्यात भाजपचे माजी मंत्री आणि 25-26 कार्यकर्ते वाद निर्माण करताना सापडले असल्याचं नाना पटोले म्हणाले. तर भाजप राज्यात हिंदु-मुस्लिम वाद निर्माण करत आहे आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीत याचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी राज्यात सुरू असलेल्या एसटी आंदोलनावरही भाष्य केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर बोलतानाही नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एसटी कामगारांच्या आंदोलनामागे भाजप आहे आणि हे आता उघड झालं आहे. एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातलं वातावरण भाजपकडून गढूळ केलं जात असल्याची खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. तर या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल राज्य सरकार सकारात्मक असून हा प्रश्न एका दिवसात सुटणार नसल्याचं नाना पटोले म्हणाले. तर एसटी कामगारांना नक्की न्याय मिळेल पण त्यासाठी त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहनही नाना पटोले यांनी केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

किरीट सोमय्या आज दिल्ली दौऱ्यावर, करणार ‘या’ नेत्यांच्या घोटाळ्याची चौकशी

कंगनाचं पुन्हा वादग्रस्त विधान; शीख समुदायाचा ओढवून घेतला रोष

मलिकांनी ट्विटरवर मध्यरात्री फोडला बाॅम्ब, समीर वानखेडेंचा ‘तो’ फोटो केला शेअर

महाराष्ट्रातील कोरोनाला आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

पुण्याच्या महापौरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘इथं’ ठरले लखपती!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More