बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इतिहासात पहिल्यांदाच राजभवनामधून भाजप कार्यालय सुरूये”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे तीन मागण्या केल्या. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांना एक पत्र लिहिलं. यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन याबाबत मला कळवा, असं म्हटलं. या पत्रावरून सध्या राज्यात टीका टिप्पणी यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आह

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र दिलं. त्याची दखल घेवून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय चालत आहे, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

नाना पटोले यांनी यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत भाष्य केलं. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत आहेत. ते राज्यातील काँग्रेसच्या आमदारांसोबत चर्चा करतील. त्यानंतर अध्यक्षपदाचं नाव हायकमांडकडे पाठवलं जाईल. त्यावर हायकमांड निर्णय घेईल, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

वाझे प्रकरणात जी स्क्रीप्ट फडणवीस यांनी वाचून दाखवली त्याच घटना कशा घडल्या? हे बीजेपीचे षडयंत्र होतं का असं चित्र निर्माण झालं आहे. यावरून आम्ही भाजपला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करू, विरोधकांना त्याबाबतचा जाब विचारू, असं नाना पटोले म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर होईन”

“आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने पडणार, फक्त वेळेचा प्रश्न आहे”

“शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय ते योग्य नसून कृषी कायद्यात बदल आवश्यक”

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ

“केंद्राला काय करायचं ते करूद्या, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More