बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली”

धुळे | पंतप्रधान हे सर्वोच्च व सन्मानाचं पद आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी या पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीये. शिरपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत नाना पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लोकशाही मान्य नाही. त्यांचा कारभार ठोकशाही पद्धतीने चालतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, या संविधानाचे रक्षण करण्याचे काम काँग्रेसने केले म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला. परंतु सत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली, असं म्हणत नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला.

मोदी सरकारने कोरोना संकटात देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. लोक तडफडून मरत असताना मोदी पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त होते. लसीकरण मोहिमेच्या अपयशाने मोदींचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली.

देशातील जनतेला लसींची गरज असताना मोदींनी पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला मोफत लस दिली आणि देशातील लोकांना मात्र लस विकत घेण्यासाठी भाग पाडले जात आहे. लसीकरण मोहिम फसली आहे परंतु प्रसिद्धीचा हव्यास लागलेल्या मोदींनी लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी कॉलेजमध्ये मोदींना धन्यवाद देणारे पोस्टर्स व होर्डींग्स लावण्याचे फर्मान काढलं आहे. लोकशाही मध्ये फर्मान कसं काय काढलं जाऊ शकतं?, असा सवाल नान पटोलेंनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

विनायक मेटेंना शिवीगाळ करत, मराठा आरक्षण बैठकीत शिवसैनिकांचा राडा!

मराठा समाजाला 3 हजार कोटींचं, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचं पॅकेज द्या- भाजप

“विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी करावी”

“एरव्ही महापौर मोहोळ मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहोचतात, पण…”

‘बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा’; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More