बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्रीय मंत्रिमंडळात सर्व दहशतवादी भरले आहेत”

नागपूर | लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांना चिरडून मारल्याप्रकरणी संपुर्ण देशभरातून पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला. या बंदवर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली. तसेच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा बंद म्हणजे स्पाॅन्सर्ड दहशतवाद असल्याची टीका केली होती.

यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना ‘शेतकऱ्यांना गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने चिरडून मारलं, या हत्येचं फडणवीस समर्थन करत आहेत का?’, असा प्रश्न विचारत केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात सर्व दहशतवादी भरलेत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता दिसून येत आहे.

‘देशाचे गृहमंत्री किंवा गृहराज्यमंत्री असतील त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे. जनभावनेचा आदर पाळून कालचा बंद महाविकास आघडीने पाळला होता’, असं नाना पटोले यांनी नागपूरमध्ये बोलताना म्हटलं आहे. जर हा फडणवीसांना स्पाॅन्सर्ड दहशतवाद वाटत असेल तर त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य तपासावं, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला आहे.

नाना पटोले यांनी भाजपवर आणि देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाची सुरूवात होऊ शकते, पण या सर्व प्रकरणात आता भाजप नेमकी काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

ईडीने जप्त केलेल्या डिएसकेंच्या बंगल्यातच झाली चोरी

महाराष्ट्रात वीजेची टंचाई होणार नाही?, ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

“युद्ध झाले तर भारताचा पराभव अटळ”

बंजी जंपिंग जीवावर बेतलं, रस्सी तुटली अन् तीन मुलं झाली पोरकी, पाहा थरारक व्हिडीओ

“सत्तेत असून 100 टक्के बंद होत नसेल, तर तुमची काय लायकी आहे हे लक्षात येतं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More