बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंच्या भविष्यवाणीची नाना पटोलेंकडून खिल्ली, म्हणाले…

नागपूर | भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारबद्दल एक मोठं वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रात अस्तित्वात असणारं ठाकरे सरकार हे येत्या मार्च महिन्यात कोसळणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी केली होती. त्या भविष्यवाणीची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे.

नाना पटोले नागपुरमध्ये बोलत असताना त्यांनी भाजप हा खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे, असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे. तसेच आता भाजपच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही, असंही ते म्हणाले आहेत.

भाजपवाले भविष्यवाणी करणारे आहेत, त्यांची भविष्यवाणी कधीही खरी ठरत नाही आणि त्यांच्यावर कोणी विश्वासही ठेवत नाही, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पुर्ण केली आहेत. त्यात ते गेल्या दोन वर्षांपासून भविष्यवाणी करत आहेत पण त्या भविष्यवाणीला काहीही अर्थ नाही,  असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला उद्देशुन लगावला आहे.

नागपूरच्या विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेसचा झेंडा फडकला जाणार असा विश्वास यावेळी बोलत असताना नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. नागपूरची जागा बिनविरोध होणार का?, असा प्रश्न विचारला असता भाजपकडून त्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

“लवकरच महाराष्ट्रात बदल दिसेल, भाजपचं सरकार येणार”

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची सर्वत्र दहशत, केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

कोल्हापूरचा गडी बिनविरोध जिंकला! पाटील यांचा मार्ग मोकळा

“…मग संविधान पाळण्याचं नाटक कशासाठी?”, राऊतांचा खोचक सवाल

लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळले जोडप्याचे मृतदेह अन् उडाली खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More