बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीस सत्तेत असताना शेतकऱ्यांनी शेती करणं सोडलं होतं”

नागपूर | महाराष्ट्रात काल लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता. या बंदवरून कालपासून चांगलंच वादंग पेटल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसेच हा स्पाॅन्सर्ड दहशतवाद असल्याची गंभीर टीका विधानसभेेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत फडणवीसांवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्र बंद करायचा आणि शेतकऱ्यांना मदत करायची नाही, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली होती. त्यावर ‘फडणवीस सत्तेत असताना शेतकऱ्यांनी शेती करणं सोडलं होतं, आता आमच्या काळात ते शेती करत आहेत, शेतकऱ्यांचं दु:ख आमच्याच सरकारला कळलं आहे’, असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.

‘दिवाळीच्या आधी राज्य सरकार कर्ज घेऊन शेतकऱ्यांना मदत करणारे पण केंद्राने मात्र गुजरातला 1 हजार कोटींची मदत करून दुजाभाव केला’, असं म्हणत ‘हे शेतकऱ्यांचे हत्यारे आहेत, शेतकऱ्यांची यांना किती काळजी आहे हे आता त्यांना कळून चुकलं आहे, त्यामुळे यापूढे लबाडीला कुणीही फसणार नाही’, अशा तिखट शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, या सर्व घटनेमुळे भाजप विरूद्ध महाविकास आघाडी सरकार असा वाद पुन्हा एकदा पेटताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या वक्तव्यावर आता भाजपकडुन काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! भारतात 2 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीला मान्यता

“मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे..”; फडणवीसांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

वारकरी सांप्रदायाला पैसा प्रसिद्धीची गरज नाही- शिवलीला पाटील

महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची बातमी

72 तास अन्नत्याग आंदोलनकर्त्या शेतकऱ्याची तब्येत खालावली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More