मुंबई | काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती खुद्द नाना पटोले यांनी दिली आहे.
आमच्या वरीष्ठ नेत्यांनी मला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्याचं मी पालन करुन माझ्या पदाचा राजीनामा विधानसभा उपाध्यक्षांकडे दिला आहे, असं नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय.
दरम्यान, नाना पटोले यांनी अजूनपर्यंत मला नव्या जबाबदारीबाबत काही कळवण्यात आलेलं नाही, असं सांगितलंय.
थोडक्यात बातम्या-
शरजील उस्मानीच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर उर्मिला मातोंडकरांचं रोखठोक मत, म्हणाल्या…
‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’; भाजपच्या या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
“लोकशाहीविरोधी वागणाऱ्या कुठल्याही शक्तीला जनतेनं सोडलं नाही, त्यांना धडा शिकवला”
“कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही”