बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतमातेचं नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघालेत”

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालूच आहेत. अशातच आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारतमातेचं नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघालेत, असा घणाघात पटोले यांनी केला आहे.

आज पुण्यातील केसरीवाड्यात ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाचे उद्घाटन प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हे अभियान राबवण्यात येत आहे. या उद्घाटन सोहळ्यात बोलताना पटोलेंनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.

यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, भारतमातेच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या लोकांचे कोणतेही योगदान नाही. ते लोक इतिहासाची तोडमोड करुन चुकीचा इतिहास मांडत आहेत आणि यातून लोकांची दिशाभूल करत आहेत. ज्या लोकांनी या भारतमातेचं नाव घेऊन सत्ता मिळवली तेच लोक आता भारतमातेला विकायला निघाले आहेत.

तसेच इंग्रजांचे सरकार अत्याचारी, जुलमी होते. स्वातंत्र्य चळवळ मोडून काढण्यासाठी त्यांनी जनतेवर अत्याचार केले. परंतु, लोक डगमगले नाहीत. आताचे सरकार देखील इंग्रज सरकारपेक्षा कमी नाही, इंग्रज सरकार देखील जुलूम करायचे आणि आत्ताचे सरकार देखील तेच करत आहे, अशी जहरी टीका पटोलेंनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

यंदा गणेशोत्सव साजरा होणार; लालबागच्या भक्तांसाठी ‘ही’ आनंदाची बातमी

सर्वसामान्यांना मोठा धक्का! LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या; पाहा नवे दर

वाह! तोंडावर सात टाके, तरी देखील भारतीय बॉक्सर लढला; झुंजारपणाचं सर्वत्र कौतुक

धोका वाढतोय! ‘या’ जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या आकड्याने मुंबईलाही टाकलं मागे

कोलकाता पाॅर्न रॅकेट प्रकरणात आणखी एका फोटोग्राफरला अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या आरोपात अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More