बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कष्टाने मिळालेलं स्वातंत्र्य वाचेल की नाही याची शंका निर्माण करणारं वातावरण सध्या देशात”

नागपूर | 14 ऑगस्ट 1946 रोजी देशात दोन समुदायामध्ये मोठा रक्तपात झाला होता. नरेंद्र मोदींना आता पुन्हा त्या रक्तपाताची आठवण करून द्यायची आहे का? देशात पुन्हा रक्तपात करायचा आहे का?, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

प्रदेश काँग्रेसच्यावतीने स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानानिमित्त नागपुरातील कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. मोदींचा आणि भाजपचा डाव ओळखा आणि या शक्तीविरोधात काँग्रेसची शक्ती उभी करा, असं आवाहनही नाना पटोले यांनी केलं आहे.

अहिंसा आणि मनुष्यशक्तीच्या बळावर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले परंतु, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा कधीच सहभाग नव्हता, मानवता व त्यागाशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशा लोकांचं सरकार सध्या केंद्रात सत्तेवर आहे. मोठ्या कष्टाने आणि बलिदानाने स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर संविधान मिळालं. आता ते स्वातंत्र्य व संविधान वाचेल की नाही, टिकेल की नाही याची शंका निर्माण करणारं वातावरण सध्या देशात आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

इंग्रज सत्तेच्याविरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जात होतं, त्यांचा आवाज दडपला जात होता. तीच परिस्थिती आज देशात आहे. केंद्रातील सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपशाहीच्या मार्गाने बंद करण्याचं काम सुरू आहे, अशी टीका पटोलेंनी केलीये.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम!

तापाने फणफणलेल्या भारताचा सुवर्णपदकवीर नीरजच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला…

“महामार्गांच्या कामात मोठा भ्रष्टाचार, चौकशी झालीच पाहिजे”

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More