बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी आणि शहा दोघेही विनामास्क फिरतात, त्यांनी कोणते इंजेक्शन घेतलं?- नाना पटोले

पुणे | केंद्र सरकारने देशवासियांना कोरोना लस विनामूल्य उपलब्ध करून द्यावी, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणारं निवेदन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दुपारी विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांना दिलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा सगळीकडे विनामास्क फिरतात त्यांनी कोणते इंजेक्शन घेतलं माहीत नाही?, असं नाना पटोले म्हणाले. त्यासोबतच नरेंद्र मोदींनीच कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे असं जाहीर केलं होतं. आता तेच राज्यांवर जबाबदारी ढकलत आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांंनी नियोजन करून आपल्या देशाला कोरोना मुक्त केलं. आपल्या प्रमुखाकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. त्यांनी लसी, ऑक्सिजन, आरोग्य सेवा यापैकी कशाचेही नियोजन केलं नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र भाजपवरही निशाणा साधला.

राज्य त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत मात्र केंद्र सरकार काहीही करायला तयार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी, मनमोहन सिंग दिल्लीत विरोधात असूनही केंद्र सरकारला कोरोना संदर्भात चांगले सल्ले देत आहेत आणि इथे महाराष्ट्रात विरोधी पक्ष मध्यरात्री दमणवरून रेमडेसिविर आणण्यात गुंतले असल्याचं नाना पटोले म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही भाष्य केलं.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत आहे ती करण्याची ही वेळ नाही. आता कोरोनाविरोधात लढायला हवं. पण तिथल्या चुका लक्षात येऊ नयेत,यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

सुजय विखेंचा गनिमी कावा, स्पेशल विमानानं दिल्लीहून 10 हजार रेमडेसिवीर आणली!

‘आजारातून बरा झाल्यावर एक झाड लाव’; सोशल मीडियावर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तुफान व्हायरल

अनिल देशमुख यांच्यावर धाड, ‘दया कुछ तो गडबड हैं’ म्हणत राऊतांकडून शंकेची वावटळ!

“उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, पण सीबीआयने धाडच टाकली”

आठवड्याभरातच कोरोनामुक्त झाला सोनू सूद, कंगणा म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More