बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला- नाना पटोले

मुंबई | काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष असून काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं, अशा तिखट शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याच सांगत असतील तर फडणवीस सरकारमध्ये जे पाप झालेत ते राज्य सरकारने उघडकीस करावं. परमबीर सिंग कोणाच्या पेरोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वाटा भाजपवाले कसा घेतात हे जनतेला माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी नाना पटोले यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरही टीका केली.

दरम्यान, राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून राजभवन भाजप कार्यालय झालं आहे. त्यांनी काय रिपोर्ट द्यावा हा त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो ठेका घेतला आहे त्यासाठी जनता माफ करणार नसल्याचं नाना पटोले म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रवासियांनो सावध व्हा! देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेली 10 पैकी ‘ही’ 9 शहरं महाराष्ट्रातील!

“एका व्यक्तीनं जरी त्रास दिल्याचं दाखवून दिलं तर उमेदवारी अर्ज भरणार नाही”

संजय राऊतांच्या घरी मेजवानी, भाजप नेत्यांनाही जेवणाचं निमंत्रण!

…म्हणून आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात आता फक्त ‘TATA SAFARI’च दिसणार!

बीचवरील हाॅट आणि बोल्ड अंदाजातील फोटोंमुळे पुजा बात्रा पुन्हा एकदा चर्चेत, पाहा फोटो!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More