बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल”

मुंबई | ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. येत्या तीन महिन्यात ओबीसींना आरक्षण नाही मिळवून दिलं तर राजकारणातून सन्यास घेईल, असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. फडणवीसांनी एक प्रकारे ठाकरे सरकारला आव्हान दिल्यासारखं आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली आहे. आता राज्यातील जनताच देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संन्यास देईन, अशा शब्दात नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पटोले आज टिळक भवनात माध्यमांशी बोलत होते.

आधी मराठा आरक्षणावरुन फडणवीस आणि त्यांच्या गँगने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आता तशीच दिशाभूल ओबीसी आरक्षणावरुन केली जात आहे. मुळात एखाद्या समाजाला आरक्षण मिळावं हे फडणवीसांच्या मनात नाही. कारण शोषित, वंचित आणि मागासवर्गीयांना मुख्यप्रवाहात आणावं, हे भाजपच्या डीएनए मध्येच नसल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेसने केली आहे.

दरम्यान,  केंद्रातील मोदी सरकार आणि तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती. पण भाजपने ते जाणीवपूर्वक होऊ दिलं नाही. आता मात्र भाजप नेते ओबीसींचा कळवळा असल्याचे दाखवत असल्याचा टोला नान पटोलेंनी लगावला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘आमच्या आमदाराला त्रास देत असतील तर…’; शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

‘नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे’; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

62 वर्षीय व्यक्तीनं केली डेल्टा प्लस व्हेरिएंटवर मात, अनुभव सांगताना म्हणाला…

“देवेंद्र फडणवीस खोटं बोलण्याचं मशीन, चार महिन्यात आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनीच ओबीसींचं आरक्षण काढलं”

हिंदी चित्रपट अश्लिल, फाॅलो करणं बंद करा – इम्रान खान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More