बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सरकारने लोकांना बरबाद केलं असून मंत्रिमंडळ विस्ताराने काही फरक पडणार नाही”

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सध्या देशभर चर्चा आहे. यामधील अनेक नेत्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते नारायण राणे यांच्यासह चार जणांची वर्णी मोदींच्या मंत्रिमंडळात लागली आहे. यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने टीका केली आहे.

मोदी सरकार गेल्या 7 वर्षांपासून फक्त एन्जॉय करत आहे आणि सत्तेचा आनंद उपभोगत आहे. पण त्यासोबतच ते लोकांना बरबाद करत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करा किंवा नका करू, त्याने काहीही फरक पडणार नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना विचारलं असता त्यांच्याकडे फाईल देखील जात नाहीत असं कळतं. सगळा कारभार पीएमओ चालवत आहे. लोकतंत्र संपलेलं आहे. फेरबदल करूनही ही पापं त्यांना धुवून काढता येणार नाहीत, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात मोदींचं सरकार आल्यापासून कृत्रिमरीत्या महागाई वाढवली आहे. उज्ज्वला योजनेतून गरीबांच्या घरी सिलेंडर पोहोचला, पण महागाई वाढवल्यामुळे गॅस मिळू शकत नाहीये. त्यात रॉकेलही बंद केलं आहे. मग लोकांनी जगायचं कसं?, असा सवाल करत नानांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

ईडी लावाल तर सीडी लावेल म्हणणाऱ्या नाथाभाऊंनाही ईडीची नोटीस???

प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा का घेण्यात आला?; वाचा सविस्तर वृत्त

“बारा वर्षात काँग्रेसला राणेंची किंमत काय आहे कळलं नाही ते भाजपच्या नेतृत्वाला कळलं”

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, उच्चांकी दरापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त; वाचा ताजे दर

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंनी सर्वप्रथम घेतली शपथ

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More