बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्रातील मोदी सरकार घालवल्याशिवाय देशातील शेतकऱ्यांसह, कष्टकऱ्यांचे अच्छे दिन येणार नाही”

मुंबई | गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला केंद्र सरकारने फार काही गांभीर्याने घेतलं नसल्याची टीका आंदोलक शेतकऱ्यांनी केली होती.  अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून पंतप्रधावन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

केंद्रातील अत्याचारी मोदी सरकारला शेतकऱ्यांसाठी वेळ देता येत नाही. तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सात महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनात 400 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी या शेतकऱ्यांची साधी भेटही घेतली नाही. शेतकरी थंडी, पाऊस, उन्हात आंदोलन करत असताना पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचारात व्यस्त होते, असं म्हणत नाना पटोेले यांनी मोदींवर टीका केली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिलं ग्रामीण अधिवेशन ज्या फैजपूर येथे झालं. तेथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांचे दहन करून उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली आहे.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी आणि अत्याचारी आहे. सरकार शेतकरी, कष्टकरी विरोधी असून शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवून देशोधडीला लावण्याचं काम करत आहेत. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी तीन काळे कृषी कायदे आणले आहेत. केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार घालवल्याशिवाय या देशातील शेतकरी, कष्टकरी यांचे अच्छे दिन येणार नसल्याचं नाना पटोेले म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

कंगना रणौतनं केली देशाचं नाव बदलण्याची मागणी, म्हणाली….

“2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही”

‘…अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

लॉकडाउनमुळे रिचार्ज न करू शकणाऱ्यांना ‘या’ कंपनीकडून मिळणार मोफत रिचार्ज!

महाविकास आघाडीत ठिणगी?, भुजबळ तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More