बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2014 पासून देशाला ग्रहण लागलं- नाना पटोले

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केंद्र सरकार आणि मोदींवर टीका करत असतात. अशातच ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्त काँग्रसेने  स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केला. या कार्यक्रमामध्ये बोलताना नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकारवर टीका केली आहे.

देशाला 2014 पासून ग्रहण लागलं असून ज्यांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही असे लोक सध्या सत्तेत आहेत. त्यांच्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली असून देशाचे चारही स्तंभ धोक्यात आले असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या लोकांचं योगदान नाही आणि त्या विचारसरणीचे लोक आज सत्तेत बसले आहेत. मोठ्या कष्टाने मिळवलेलं स्वातंत्र्य आणि लोकशाही मोडीत काढण्याचं काम सध्या करत आहेत. लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी येऊन लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सहभागी व्हावं, असंही आवाहन नाना पटोलेंनी केलं आहे.

दरम्यान, अत्याचारी इंग्रज सरकारला आजच्या दिवशी 9 ऑगस्ट 1942 साली ऑगस्ट क्रांती मैदातानूत ‘चले जाव’ चा नारा देत देशभर आंदोलन उभं राहिलं असल्याचं पटोलेंनी सांगितलं. नाना पटोलेंनी केलेल्या टीकेवर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला, म्हणाले ‘आधीचे रेल्वे मंत्री…’

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची तारीख जाहीर; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

धडाकेबाज फलंदाज स्टीवन स्मिथ घाबरतो जगातील ‘या’ चार गोलंदाजांना; ‘या’ भारतीयाचा आहे समावेश

सोन्याच्या दरात मागील चार महिन्यातील सर्वात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

मुलाच्या UPSC साठी राहतं घरं विकलं, पोराने IAS होऊन बापाचं स्वप्न पूर्ण केलं!

“सगळं केंद्राने करावं आणि केंद्राने द्यावं, मी फक्त मर्सिडीज चालवणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More