बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छप्पन इंच छातीचे पंतप्रधान असताना खासदारच असुरक्षित- नाना पटोले

मुंबई  | मुंबईच्या हॉटेलमध्ये दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून महाराष्ट्रातील वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून भाजपला इशारा दिलेला असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

एका आदिवासी खासदाराला आत्महत्या करायला लावण्याचं काम केंद्रातील मोदी सरकारने आणि गुजरातमधील भाजप सरकारने केलं आहे. डेलकरांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये इशारा केला आहे. ते पंतप्रधानांना भेटले, गृहमंत्र्यांनाही भेटले. लोकसभेत 56 इंच छातीचे पंतप्रधान आहेत पण जिथे खासदारच सुरक्षित नाहीत, तर देशाची जनता सुरक्षित कशी असं म्हणत नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला.

आदिवासी समाजाचे डेलकर हे सातवेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यांना प्रचंड मरण यातना देण्यात आल्या. आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केले पण शेवटी मुंबईत येऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली. त्यांच्या 15 पानाच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई करण्यात यावी असी मागणी पटोलेंनी केली आहे.

दरम्यान, कोरोनाची चाहूल लागताच डिसेंबर 2019 मध्येच देशाच्या सीमा सील करण्याची गरज असताना केंद्रातील सरकारने ते काम केलं नाही. दिवे लावा, थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा असे प्रकार केलं आणि अचानक लॉकडाऊन लावल्यानं गरिब, कामगार, मजूर वर्गाचे झालेले हाल जगाने पाहिले असल्याचं पटोले म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

“धनंजय मुंडेंचा राजीनामा कुठल्या अधिकाराने मागताय, तुम्ही केलेल्या सर्व घोटाळ्यांची चौकशी लावायला पाहिजे

‘IPLमध्ये खेळापेक्षा पैशांवर लक्ष, आयपीएलपेक्षा पीएसएल भारी’; डेल स्टेनचा जावई शोध

राठोडांनी पाच कोटी दिल्याचा आरोप केल्यावर लहू चव्हाणांनी शांता राठोडांविरोधात उचललं मोठं पाऊल

‘शिवसेना नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका’, कंगणानं उचललं हे मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More