बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाना पटोले घेणार राज्यपाल कोश्यारींची भेट; हँगिंग गार्डनपासून सायकलने राजभवनावर जाणार

मुंबई | पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलेंडर, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशात वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. मे महिन्यापासून पॅट्रोल-डिझेलच्या भावात वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. ती आजपर्यंत सुरूच आहे. आज पॅट्रोल-डिझेलचे भाव तर गगनाला टेकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने इंधन दरवाढीवर आक्रमक भुमिका घेतल्याचं चित्र आहे.

काँग्रेस पक्ष या महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत आहे. त्यानंतर आज गुरुवारी काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. हँगिंग गार्डनपासून राजभवन पर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार आहे. याआधी काँग्रेसने इंधन दरवाढीवर सात्त्याने आंदोलने केली आहेत. त्याच बरोबर त्यांनी बैलगाडीतून देखील आंदोलन केलं होतं.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. इंधन, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. जगणे मुश्कील केलेल्या या सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडेल आणि झोपी गेलेल्या मोदी सरकारने जागे होऊन जनतेला दिलासा द्यावा यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसने 7 जुलैपासून राज्यात विविध आंदोलने करून मोदी सरकारच्या महागाईविरोधात आवाज उठवला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

थोडक्यात बातम्या-

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांमध्ये 89 पदांवर भरती; असा करा अर्ज

सोन्याच्या दरात आज देखील वाढ, वाचा ताजे दर

शरद पवारांना राष्ट्रपती करायचं असेल तर….- प्रविण दरेकर

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला जमावाकडून बेदम मारहाण

“देवेंद्र फडणवीस म्हणजे राजकारणातील सर्वात लबाड माणूस”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More