गोंदिया महाराष्ट्र

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, नाही तर…- नाना पटोले

गोंदिया | दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींना पत्र पाठवून हा कायदा रद्द करावा, अशी मागणी केली केली आहे.

2017 मध्ये शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र, आता पुन्हा 17 डिसेंबर पर्यंत केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले नाही तर आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.

केंद्र सरकारनं शेतकऱ्यांवर अन्याय करणारे काळे कायदे आणले आहेत. जिथं शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल त्याविरोधी आंदोलनात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा देणे माझे कर्तव्य आहे, असंही नाना पटोले म्हणालेत.

नाना पटोले यांनी संविधानिक खुर्चीवर जरी बसलो असलो तरी तरी मी शेतकरी आहे, असं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आम्हाला कोणताही ईगो नाही, चर्चेसाठी नवी तारीख सांगा- नरेंद्रसिंह तोमर

‘…तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही’; रोहित पवारांचा दानवेंना इशारा

“मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी राज्य सरकारवर टीका करणे दुर्दैवी”

“भाजपला बुडवण्यास रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जबाबदार”

“नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या