‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच’; नाना पटोलेंच्या नव्या दाव्यानं खळबळ
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण तापलेलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ बॉम्ब आणि रेकाँर्डिंगने खळबळ उडवून दिली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीबाबत एक दावा केला आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवणार. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. अनेक दिवसांपासून नाना पटोले स्वबळाची भाषा करत आहेत. त्यातच आता नाना पटोले यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रात भाजपची सत्ता असल्याने सत्तेचा दुरूपयोग केला जात आहे. काँग्रेससोबतच अन्य विरोधी नेत्यांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयची चौकशी लावण्यात येत आहे. विरोधकांना जेरीस आणायचे ही केंद्रात असलेल्या मोदी सरकारची रणनीती आहे, अशी टिका केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेस पक्षाची वर्किंग कमिटीची बैठक नुकतीच पार पडली आहे. पाच राज्यांमधील पक्षाच्या पराभवाचे कारण काय आहे, याचा शोध घेण्यात आला. काँग्रेसमधील काही नेत्यांनी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी मागणी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक ! कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटनं टेंशन वाढवलं
“आम्ही बोललो की शरद पवारांचे चमचे आहेत, हे काल पक्षात आलेले…”
‘बॉम्ब कुठं आहे?’ विचारत धनंजय मुंडेंनी थोपटले दंड, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘या’ ठिकाणी लाॅकडाऊन जाहीर
मुंबईतील पेपरफुटी प्रकरणावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Comments are closed.