मुंबई | वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथल्या प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रकार सोमवारी घडला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी संबंधित पीडितेचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचं म्हटलं आहे.
विचारांपलिकडची क्रुरता…. आयुष्य उध्वस्त करणारी घटना…आणि त्याहून क्रुर म्हणजे जेव्हा आपण ही बातमी वाचून वृत्तपत्राचं पान उलटतो… कशी आहे ती… तिच्या उपचाराचा खर्च ती कसा उचलतीये… जर कुणी पीडितेला किंवा तिच्या कुटुंबाला ओळखत असेल तर मला नक्की कळवा. मी तिला सर्वोतपरी मदत करणार असल्याचं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.
मला वृत्तपत्राचं पान उलटून गप्प राहायचं नाही. माझ्या परीने मदत करून नाही जमलं तर लोकवर्गणी काढून आपण मदत करणार आहोत, असं महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, संबंधित पीडितेची प्रकृतीत हळुहळू सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Let me see if we can start a crowd funding initiative for this, and other such victims where we can all contribute. https://t.co/0aMV1mQjQY
— anand mahindra (@anandmahindra) February 7, 2020
…तर आमदारकीचाही राजीमाना देईल- तानाजी सावंत
महाविकास आघाडी सरकारचं लवकरच सीझर होणार- बबनराव लोणीकर
महत्त्वाच्या बातम्या-
तुम्ही करा मिशन कमळ… आमच्याकडे हात अन् धनुष्यबाण आहेच; भुजबळांचा टोला
“माझ्याभोवती माता-भगिनींचं सुरक्षा कवच; लाठ्यांचा काहीही परिणाम होणार नाही”
मोदींकडे वागण्याची, बोलण्याची कसलीच पद्धत नाही; राहूल गांधींची टीका
Comments are closed.