Top News आरोग्य कोरोना नांदेड पुणे महाराष्ट्र

सावधान!! कोरोनासंदर्भात अफवा पसरवाल तर… प्रशासनानं नागरिकांना दिला इशारा!

Photo courtesy- Pixabay

नांदेड | महाराष्ट्रात सध्या कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या नागरिक निष्काळजीपणे वागत असून, कोरोनासंदर्भात ठरवण्यात आलेेेल्या नियमांचं उल्लंघन होत आहे त्यामूळे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी दिली.

नववर्षात कोरोना आटोक्यात आला असताना आता त्याने पून्हा डोके वर काढायला सूरूवात केली आहे. अशातच कोरोनासंदर्भात अनेक अफवांना पेव फूटले आहे. प्रशासनाने आता अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचं ठरवलं आहे.

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे, त्यातच आता नांदेड शहरात पून्हा एकदा संचारबंदी होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश दिले आहेत. सध्या जरी कोरोनाची परिेस्थिती आटोक्यात असली तरी ती हाताबाहेर जाण्याआधी हे पाऊल उचललं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कोरोनासंदर्भात खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात आता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

पुणे-मुंबईतही जुने व्हिडीओज समाज माध्यमांवर प्रसारित करून लॉकडाऊन पून्हा होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, अशा अफवांना बळी न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून जनतेला करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर मी माझी खासदारकी फेकून देतो- खासदार संभाजीराजे

बाबो! एक थाळी संपवा अन् मिळवा एक तोळ सोनं, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

महाराष्ट्रसह देशातील ‘या’ राज्यातही कोरोनारूग्णांचा वाढला आकडा

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दिली ‘या’ तीन चेहऱ्यांना संधी

गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण वाढले, जाणून घ्या ताजी आकडेवारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या