बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संतप्त मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आता मराठा आमदार

नांदेड | मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या निशाण्यावर आता मराठा आमदार असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर मराठा आमदारांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर आता त्यांच्या पुतळ्यांचं दहन सुरु आहे. 

नांदेडमध्ये जिल्ह्यातील 6 मराठा आमदारांच्या पुतळ्यांचं दहन करण्यात आलं. नांदेडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र आलेल्या आंदोलकांनी मराठा आमदारांचे पुतळे जाळले. 

मराठा आमदार मराठा आरक्षणासाठी आवाज उठवत नाहीत. ते काहीच कामाचे नाहीत, अशा तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. मराठा आमदारांविरोधात यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. 

महत्त्वाच्या बातम्या–

-57 मोर्चे शांततेत केले आता आमचा अंत पाहू नका; मराठा समाज आक्रमक

-…तर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात पाय ठेवू नये; सोलापुरात मराठे आक्रमक

-मराठा आमदार आणि खासदारांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

-परळी मराठा मोर्चाच्या समर्थनासाठी साताऱ्यात ठिय्या आंदोलन

-मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More