बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींवर नरसिंहराव आणि मनमोहन सिंग भारी, गुंतवणूकदारांना मिळाली सर्वाधिक कमाई

मुंबई | शेअर बाजार म्हणजे पैशाची खाण समजली जाते. श्रीमंत व्हायचं स्वप्न घेऊन अनेक जण शेअर बाजारात उतरतात. काहीजण यशस्वी होतात. तर काही जणाच्या पदरी निराशा पडते. शेअर बाजारच्या उलाढालीवर केंद्र आणि राज्य सरकारचा मोठा रोल असतो. सरकारी नियमांवर उद्योगांची उभारी आणि पिछाडी अवलंबून असते. सरकार बदलं की कंपन्यांचं महत्व बदलतं. सध्याच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात गुंतवणूकदारांच्या हाती निराशा लागल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

इतिहासाची आकडेवारी पाहिल्यास आजही काँग्रेसचे नरसिंह राव यांच्या कार्यकाळात गुंतवणूकदारांनी सर्वाधिक कमाई केल्याचं दिसून येतं आहे. नरसिंह रावांच्या कार्यकाळात शेअर बाजारामधील सर्वाधिक परतावा गुंतवणूकदारांना मिळाला. त्यांच्या कार्यकाळाआधी शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1337 अंकांवर होता, कार्यकाळ पूर्ण केला, तेव्हा शेअर बाजाराचा सेन्सेक्स 3823 अंकांवर पोहोचला होता. म्हणचेच नरसिंह राव यांच्या कार्यकाळात बाजाराने गुंतवणूकदारांना 186 टक्के परतावा दिला होता.

अच्छे दिन आयेंगे, या भरोश्यावर अनेकांनी मोदी सरकारला मतदान केलं. मोदी सरकार आल्यावर सेन्सेक्सने 2000 अंकांची भरारी घेतली होती. परंतू त्यानंतर नोटबंदी, जीएसटी आणि कोरोनामुळे मोठमोठ्या कंपन्याचं कंबरडं मोडलं. त्याच बरोबर शेअर बाजारात देखील मोठी घसरण झाल्याचं दिसलं. मोदींच्या राज्यात गुंतवणूकदारांना मे 2014 ते जून 2021 पर्यंत शेअर बाजारामध्ये केवळ 111 टक्के परतावा दिला आहे. तर त्याआधी मनमोहन सिंग यांच्या काळात गुंतवणूकदारांना बाजारातून 180 टक्के परतावा मिळाला होता.

दरम्यान, वाजपेयी सरकारच्या काळात अनेकांनाच्या पदरी निराशा पडली होती. न्युक्लियर चाचणी आणि अमेरिकेने घातलेले निर्बंध यामुळे वाजपेयी सरकारच्या काळात गुंतवणुकदारांना केवळ 27 टक्के परतावा मिळाला होता. त्यामुळे आजही नरसिंह रावांच्या कार्यकाळात गुंतवणूकदारांनी सर्वाधिक कमाई केल्याचं दिसून येतं आहे.

थोडक्यात बातम्या-

“जेवल्याशिवाय जाऊ नका”, खडसेंचा आग्रह; फडणवीस म्हणाले…

मोठी बातमी! उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का, “126 आमदार बंडाच्या तयारीत”

‘आयुर्वेदिक उपचार करताना एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही’; भारतीय आयुर्वेद संस्थेचा दावा

“मी 39 वर्ष शिवसेनेत होतो, मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे मला माहितीये”

चिमुकल्याचं 90% फुफ्फुस खराब झालं; सिटी स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More