बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा”

लखनऊ | भारतात मुस्लिमांची वाढती संख्या हिंदूंच्या विनाशाचं कारण बनणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्तर प्रदेशच्या मथूरा गाजियाबाद येथील महंत नरसिंहानंद यांनी केलं आहे. गाजियाबादच्या डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मथुरा येथे पोहचले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कोरोना महामारी हे सरकारचं षडयंत्र आहे. मास्क लावून लोकांना आजारी पाडलं जातंय. त्यामुळे मी ना मास्क लावणार ना कोरोना आहे असं मानणार. तसेच ज्यांची इम्युनिटी क्षमता कमी आहे. ते लोक मास्क लावतात, असं महंत नरसिंहानंद यांनी म्हटलं आहे.

मला माझ्या इम्युनिटीवर विश्वास आहे. मी कोरोनाला मानत नाही. ज्यांची इच्छाशक्ती कमी अथवा कमकुवत आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्यासोबत नाहीत तेच लोक कोरोनामुळे मृत्यू पावत आहेत. माझे सर्व माझ्या सोबत आहे, असंही नरसिंहानंद म्हणाले. तसेच भारतात मुस्लिमांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. ज्याठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली आहे त्याठिकाणी ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. हिंदू नेत्यांवर भरवसा ठेऊ नका, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, डासना मंदिरात पाणी पिण्यासाठी एक मुस्लीम मुलगा आला होता तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली होती तेव्हा या मंदिराचे महंत असलेले नरसिंहानंद सरस्वती चर्चेत आले होते.

थोडक्यात बातम्या- 

‘पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी द्या’; शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा, शिवसेना नसती तर…”

‘या’ वयोगटातील मुलांना मास्कची गरज नाही; वाचा केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

“मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांना विरोध नाही, पण आम्ही काय भिकारी आहोत का?”

“काँग्रेसच्या अस्तित्वासाठी राहुल गांधींना मजबूत टीम तयार करावीच लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More