बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एक मिनिट साहेब जेवतायेत”; …अन् जेवत्या ताटावरून नारायण राणेंना अटक, पाहा व्हिडीओ

रत्नागिरी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण यांना चांंगलंच भोवलं आहे. नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये दिसत आहे की, नारायण राणे जेवत आहेत आणि त्यांना अटक होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली खेचली असती, असं नारायण राणे म्हणाले होते. यावरून शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राज्यभर आंदोलन पुकारलं. या आंदोलनामध्ये शिवसैैनिकांनी राणेंची मालमत्ता असणाऱ्या गोष्टींची तोडफोड केली.

राणेंविरोधात पुणे, रायगड, नाशिकमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली.

दरम्यान, नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी निलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात होते.

 

थोडक्यात बातम्या-

“तुमच्या घरात घुसून हिशोब चुकता करेल”, पाहा व्हिडीओ

करिश्मा तन्ना आणि करण बोहरा यांनी दिली ‘बिग बाॅस’वर प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर शरद पवारांंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

पाटलांना मी आत्तापर्यंत विद्वान समजत होतो पण आता…- देवेंद्र फडणवीस

अमरावतीत युवासेनेनं पेटवलं भाजप कार्यालय, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More