महाराष्ट्र मुंबई

“ना जीडीपी कळतो, ना अर्थव्यवस्था, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय”

मुंबई | उद्धव ठाकरेंना ना अर्थव्यवस्था कळते ना जीडीपी कळतो. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय. उद्धव ठाकरेंवर अधिकारी हसतात, अशी घणाघाती टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

दसऱ्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी नारायण राणे आणि कुटुंबावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युतर दिलं.

मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून एकही काम यांनी नीट केलं नाही. यांना जीडीपी कळत नाही, अर्थव्यवस्था माहिती नाही. अधिकारी हसतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसला आहे. माझे सर्व शब्द त्यांना सांगा, असं राणे म्हणालेत.

मराठी माणसासाठी शिवसेना आहे म्हणता मग मुख्यमंत्री झाल्यावर काय केलं तुम्ही त्यांच्यासाठी, असा प्रश्न नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत म्हणजे विदूषक, कोणत्या धुंदीत आहात?- नारायण राणे

बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून गप्प बसलोय, आमच्याकडे नजर फिरवू नका नाहीतर…- नारायण राणे

“सुशांतची केस अजून संपलेली नाही, आदित्य ठाकरे खुनाच्या आरोपाखाली गजाआड जाणार”

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार?”

“उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या