बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”

मुंबई | सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे, असं भाजप नेते नारायण राणे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही, असं नारायण राणे म्हणाले. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेप्रकरणावर भाष्य करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. अंबानी स्फोटक प्रकरणात पोलिसांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केला जात आहे. कुणाला तरी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, असं नारायण राणे म्हणालेत.

दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दिशाच्या घरी तिचे काही मित्र गेले होते. त्यावेळी त्यांची बाचाबाची झाली. त्यातच तिची हत्या झाली. त्यावेळी तिथे एक मंत्रीही उपस्थित होता. दिशा सालियन प्रकरणापासून ते सुशांतसिंग ते मनसुखप्रकरणापर्यंतची वाझेंची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

वाझेंची पोलीस दलात पोस्टिंग कोणी केली. दिशा सालियन प्रकरणातही वाझेंकडे पोस्टिंग कोणी दिली. पोलिस दलात वाझेंचा गॉडफादर कोण आहे?, असा सवाल नारायण राणेंनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“दैव जाणिले कुणी?” या उक्तीप्रमाणे ते चौघे मरणाच्या दारातून परतले, पाहा व्हिडिओ!

आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल- शरद पवार

‘या’ कार्सवर मिळतोय 60 हजारांचा डिस्काऊंट; जाणून घ्या अधिक माहिती

‘हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केलाय’; शरद पवारांचा कोश्यारींना टोला

…अन् तसं झालं तर ठाकरे सरकार देखील पडू शकतं- कंगणा राणावत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More