बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं?- नारायण राणे

मुंबई | पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’  या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे.

गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर संभाजी ब्रिगेड संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, भाजप आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतलाय. यात लेखकाने छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हत्येचा आरोप करुन त्यांची बदनामी केल्याचं या संघटना आणि पक्षांचं म्हणणं आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध व्यक्त केलाय.

कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं याची माहिती मिळाली पाहिजे. गिरीश कुबेर तुम्ही मर्यादा सोडून हे लेखन केलं आहे, त्यामुळे मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही, असं ट्वीट नारायण राणे यांनी केलंय.

गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केले आहे. या लेखनाबद्दल गिरीश कुबेर यांचा मी जाहीर निषेध करतो. त्यांच्या या लेखनामुळे मराठा समाजाला दुःख वाटत आहे, असं नारायण राणे यांंनी म्हटलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!’ बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी ‘ही’ अभिनेत्री झाली ट्रोल

कारागृहात जाताच ढसाढसा रडला पैलवान सुशीलकुमार, अशी गेली पहिली रात्र!

“मुलं जन्माला घालण्यासाठी मी काही यंत्र नाही, मुलं जन्माला नाही घातली तर काय फरक पडतो”

…नाहीतर ही शेवटची चड्डीही काढेन; नाशिकमधील आंदोलनाची देशभरात चर्चा

हार मानेल ती आई कसली! 2 वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानं आईनं घेतला ‘हा’ निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More