Top News महाराष्ट्र मुंबई

“पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे. केंद्राच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आज कणकवलीमध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

नरेंद्र मोदींचा नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे तर देशाचा प्रमुख घटक शेतकरी आहे. आमच्या शेतकऱ्याला सबळ बनवलं पाहिजे, आर्थिक समृद्ध बनवलं पाहिजे. या कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळाला पाहिजे म्हणून त्यांना कृषी कायदे आणले असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचा हा नवा कृषी कायदा आहे. या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय?, का इथं आंदोलनं होत आहेत?, ही राजकीय आंदोलनं असल्याचं राणे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?, ते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याच्या गोष्टी करतात, असं म्हणत राणेंना राहुल गांधीवर टीका केली.

थोडक्यात बातम्या- 

“मोदींनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीत भाजप 400चा आकडा करणार क्रॉस”

“मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव”

‘बंगाल टायगर’ सौरव गांगुलीला डिस्चार्ज; दादा म्हणाला….

…त्यामुळेच सोनू सूदवर कारवाई करण्यात आली- राम कदम

“आता जनाबसेनेने उगाच मिशांना पीळ देऊ नये, जनतेला तुमची लायकी कळली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या