बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ! ‘त्या’ प्रकरणी मुंबई महापालिकेनं 7 दिवसात उत्तर मागवलं

मुंबई शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद आता दिवसेंदिवस वाढत जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर सुरू झालेला वाद नवीन वक्तव्यांनी वाढतच चालला आहे. अशातच मुंबई महापालिकेनं नारायण राणेंना सलग दुसरी नोटीस बजावली आहे.

नारायण राणेंच्या जुहू येथील अधिश बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका राणेंवर ठेवण्यात आला आहे. बंगल्याचा बांधकामात एफएसआयचं उल्लंघन केल्याचा दावा पालिकेनं केला आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर आता फ्लोअरनूसार नोटीस बजावली आहे.

मुंबई महापालिका कायदा 1988 च्या कलम 351 अंतर्गत राणेंना नोटीस बजावण्यात आली आहे. नारायण राणेंनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनं सात दिवसांच्या आत महापालिकेला उत्तर देण्याचे आदेश पालिकेनं दिले आहेत. परिणामी राज्यात आता पुन्हा ठाकरे-राणे वाद भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यावर  दिशा सालियान प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणी त्यांना नोटीस आल्यानं वाद वाढला आहे.

थोडक्यात बातम्या – 

अन् राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनं भिरकावली फडणवीसांच्या गाडीवर चप्पल

“ईडीला राज्यात शेतकऱ्यांच्या बिडीऐवढी पण किंमत राहिली नाही”

बिगुल वाजलं! आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; पाहा तुमच्या आवडत्या संघाचा सामना कधी होणार?

“कोणाला सांगताय म्हातारा झालोय, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थकणार नाही”

“पुणे महापालिकेत येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More