‘दिशा सालियनवर बलात्कार झाला तेव्हा फ्लॅटबाहेर मंत्र्याचे…’, राणेंचा खळबळजनक दावा
मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत व दिशा सालियन या दोघांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाला असल्याचा खळबळजन दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत दिशा सालियन व सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नव्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.
दिशा सालियनचा मित्र रोहन रायने तिला जबरदस्ती पार्टीत बोलावलं व ती निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यावेळी त्या फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते?, असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.
सुशांतला ही गोष्ट समजल्यानंतर मी कोणालाही सोडणार नसल्याची भाषा त्याने केली. त्यानंतर काही जण त्याच्या घरी गेले व बाचाबाचीनंतर सुशांतचीही हत्या केली, असा खळबळजनक दावा नारायण राणेंनी केला आहे.
दरम्यान, सुशांत सिंह आणि दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास पुन्हा सुरू होऊ शकतो, असंही राणे म्हणाले. शिवाय, या प्रकरणांतील पुरावे कोणी नष्ट केले, या प्रकरणात कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता याची आम्हाला माहिती आहे. मी हे सगळे पुरावे संबंधित तपास यंत्रणांना देईन, असा इशारा देखील नारायण राणेंनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
“…पण आज शिवसेनेचे पक्षप्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर उठलेत”
कोरोना संसर्ग जास्त काळ राहिल्यास ‘या’ गोष्टीवर होऊ शकतो गंभीर परिणाम
‘तू कोणाची सुपारी घेऊन आलाय का?’, भर भाषणात अजित पवार संतापले
“फुकट वडापाव खाणाऱ्यांनो तुमची शहर सांभाळण्याची औकात नाही”
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर
Comments are closed.