काँग्रेसला चांगली अद्दल घडवा; नरेंद्र मोदींचा घणाघात

बंगळुरू | काँग्रेसला अद्दल घडवा, असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केलं आहे. ते बंगळुरूमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

कर्नाटकात निवडणुका झाल्या त्यावेेळी आमच्याकडून काही उणिवा राहिल्या पण त्यामुळे कर्नाटकचे मोठे नुकसान झालं आहे. आता काँग्रेसला मतदान करून तुम्ही पुन्हा कर्नाटकचे नुकसान होऊ देणार का? असा सवाल मोदींनी केला आहे.

जम्मू-काश्मीरमधून लष्कराला हटवण्याची भाषा काँग्रेसने केली आहे. जे पाकिस्तानला हवं आहे तेचं काँग्रेसकडून वारंवार बोललं जातं, असं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, काँग्रसने त्यांच्या जाहीरनाम्यात सत्तेवर येऊ द्या असं म्हटलंय, पण स्वप्न बघण्यापासून कोणाला रोखता येईल का? त्यांना सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहू द्या, असा टोला मोदींनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-बटलर आला आणि मुंबईला असा तडाखा देऊन गेला की बास रे बास!

-पार्थ पवारांना दिलासा; या 2 माजी नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

-विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन गावकऱ्यांची महिलेला विक्षिप्त शिक्षा!

-नरेंद्र मोदींशिवाय चांगला पंतप्रधान पाकिस्तानला मिळू शकत नाही- अरविंद केजरीवाल

-आशिष शेलार-सचिन सावंतांमध्ये जुंपली! ट्वीटरच्या माध्यमातून रंगलं शाब्दिक युद्ध