नवी दिल्ली | ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी माझं सरकार आहे, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम देशवासियांना दिला. ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देत होते.
संसदेत केलेल्या भाषणात त्यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधी पक्षांना चिमटे काढले. गेल्या पाच वर्षात देशात घडलेला बदल आणि येणाऱ्या वर्षात सरकारची ध्येय त्यांनी बोलून दाखवली.
आधीच्या सरकारांबद्दल जनतेत ‘हे का नाहीत करत?’असे प्रश्न उपस्थित व्हायचे, आमच्या सरकार बद्दल ‘हेही काम सरकार का करतं?’असं म्हणावं लागतं, इतका बदल आम्ही करून दाखवलाय, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, उंची बद्दल आमची तुमच्याशी स्पर्धाच नाही. तुम्ही इतक्या उंचीवर पोहोचला की तुमचा जमिनीशी संपर्क तुटलाय. तुम्हाला तुमची उंची मुबारक, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
महत्वाच्या बातम्या
-जगनमोहन रेड्डींचा आणखी एक निर्णय; चंद्राबाबूंना मोठा झटका!
-शेतकरी आत्महत्यांसंबधी संसदेत सुप्रिया सुळेंचा धक्कादायक अहवाल
-आम्ही विधानसभेत आंघोळ करूनच येणार; मुख्यमंत्र्यांचं अजित पवार यांना प्रत्युत्तर
-“उद्धव ठाकरेंना विधानसभेची चाहूल; म्हणूनच आता शेतकऱ्यांचा पुळका”
-मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टी थकित; राष्ट्रवादी युवकचं भीक मागो आंदोलन
Comments are closed.