बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदी हे देशाला याेग्य दिशेने नेणारे युगपुरुष”

नवी दिल्ली | खासदार जमयंग नमग्याल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. नमग्याल यांनी नरेंद्र मोदींचा ‘युगपुरुष’ असा उल्लेख केला आहे.

जम्मू आणि काश्मीरसाठी पुरवणी मागण्यांबाबत झालेल्या चर्चेत जमयंग नमग्याल यांनी माेदींवर काैतुकाचा वर्षाव केला. तसेच यावेळी स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची स्वप्नपूर्ती नरेंद्र माेदींकडून हाेत असल्याचं जमयंग नमग्याल म्हणाले.

अरुणाचल प्रदेशचे भाजप सदस्य तापीर गाओ यांनी देखील नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. गाओ यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईश्वराचा अवतार म्हटलं आहे. यावेळी अरुणाचल प्रदेश व इशान्येकडील राज्यांमध्ये पायाभूत विकासकामांचा उल्लेख गाओ यांनी केला. माेदी सरकारने काेराेना महामारीचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययाेजनांचा उल्लेखही गाओ यांनी केला. तसेच माेदींच्या नेतृत्वामध्ये भारताकडून 100 हून अधिक देशांना काराेनाच्या लसींचा पुरवठा हाेत आहे. हे निश्चितच काैतुकास्पद असल्याचं गाओ म्हणाले.

दरम्यान, हिमाचल प्रदेशचे नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांनी काही दिवसांपूर्वीच माेदींचा ‘भगवान शंकराचा अवतार’ म्हणून उल्लेख केला हाेता.

थोडक्यात बातम्या- 

“पुढील दहा दिवसांत पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक राहणार नाही”

फेसबुक, मेसेंजरसह व्हॅाट्सअपची सेवा काही काळासाठी ठप्प

“मोदींना विरोध म्हणजे भारतमातेला विरोध, तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार”

“राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय शरद पवारच घेतील”

“महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More