बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींनी घेतली जो बायडन यांनी भेट; दोन दिग्गज नेत्यांमध्ये बैठक सुरू

मुंबई | सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिकेचा दौरा आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा अमेरिका दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्या मोदींनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली आहे.

जो बायडन यांच्या विजयानंतर भारत आणि अमेरिकेच्या दोन राष्ट्रप्रमुखांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे आता या दोघांच्या बैठकीवर सगळ्या जागतिक शक्तींचं लक्ष लागलं आहे. या दोघांच्या बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. तुमच्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिकेच्या संबंध विस्तारण्याचं बी पेरलं गेलं आहे, असं नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत म्हटलं आहे.

महात्मा गांधी यांची पुढील आठवड्यात जयंती आहे. त्यावेळी आपण महात्मा गांधी यांची जयंती साजरी करणार असल्याचं जो बायटन यांनी सांगितलं आहे. तर गांधीजींचा अहिंसेचा संदेश आज पहिल्यापेक्षा अधिक पटीने महत्वाचा असल्याचं देखील जो बायटन यांनी यावेळी सांगितलं आहे.

व्यापाराला भारत आणि अमेरिका या दोन्ही देशामध्ये स्वतःचं एक वेगळंच महत्त्व आहे. या दशकात आपण एकमेकांना पूरक असू शकतो. अमेरिकेकडे अशा काही अनेक गोष्टी आहेत ज्या भारताला आवश्यक आहेत आणि भारताकडेही अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी अमेरिकेसाठी उपयुक्त ठरू शकतात. या दशकात व्यापार हा प्रमुख मुद्दा असेल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नितीन गडकरी हे केंद्रातील सर्वात लोकप्रिय नेते – सुप्रिया सुळे

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा – जयंत पाटील

किरीट सोमय्यांबाबत त्यादिवशी जे घडलं ते चुकीचंच होतं – अजित पवार

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून राज्यातील मंदिरं उघडणार; मुख्यमंत्र्यांकडून सुधारित आदेश जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More