विकला असेल चहा, मात्र देश नाही विकला- नरेंद्र मोदी

राजकोट | मी चहा विकला, मात्र देश नाही विकला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक काँग्रेसच्या वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी काँग्रेसवर निशाणा साधला. ते राजकोटमधील जाहीर सभेत बोलत होते.

मी गरीब कुटुंबातील आहे. गरीब घरातील व्यक्ती पंतप्रधान झाल्याचं काँग्रेसच्या पचनी पडलेलं नाही. काँग्रेसने गरीबांची चेष्टा करणं थांबवावं, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 

बाबुभाई पटेलांचे सरकार काँग्रेसने टिकू दिले नाही. केशुभाई पटेल तसेच आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले, असं सांगत त्यांनी पटेलांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न केला.