देश

CAB बील पास झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया!

नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत 117 विरुद्ध 92 मतांनी मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर आनंद व्यक्त केला आहे.  भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याची भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

1955 मधील नागरिकत्व विधेयकात दुरुस्ती करण्यात आल्याने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या विविध 6 धर्मीय निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंधुभाव आणि दयेच्या दृष्टीकोनातून भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे.

राज्यसभेत नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्याने मी आनंदी आहे. या विधेयकाच्या बाजूने ज्या सदस्यांनी मतदान केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, जे निर्वासित वर्षानुवर्षे यातना सहन करत आहेत. त्यांची यातना हे विधेयक दूर करणार आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या