देश

”भाई और बहनों… तुमने सिर्फ ट्रेलर देखा है, पिक्चर अभी बाकी है”

रांची : निवडणुकीवेळी मी तुम्हाला दमदार सरकार देण्याचे वचन दिले होते. मागील शंभर दिवसात देशाने केवळ ट्रेलर पाहिला आहे. संपूर्ण पिक्चर तर अजून बाकीच आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

जनतेची लूट करणाऱ्यांना त्यांच्या जागी पोहचवायचे, हा आमचा संकल्प आहे. यावर काम सुरू आहे आणि काहीजण त्यांच्याजागी गेलेत देखील, असं सूचक वक्तव्य मोदींनी यावेळी केलं. ते रांचीत बोलत होते.

रांचीत पंतप्रधान मोदींनी किसान मानधनसह अनेक विकास योजनांची सुरूवात केली. यावेळी शेतकऱ्यांना पेन्शन कार्डाचे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना उद्देशून मोदींनी, स्वतःला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजणारे आज जामीनासाठी दाद मागत फिरत असल्याचे म्हटलं.

‘पंतप्रधान जीवन ज्योती योजना’ आणि ‘पंतप्रधान सुरक्षा विमा योजना’ या दोन्ही योजनांशी 22 कोटींपेक्षा जास्त देशवासी जोडले गेले आहेत. यातील 30 लाखांपेक्षा अधिकजण झारखंडमधीलच आहेत, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या