देश

‘मोदी है, मौका लिजिए’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

Photo Credit- Narendra Modi Twitter

नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरूवातीला झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत उत्तर दिलं.

मोदींनी सुरूवातीला कोरोनाकाळातील देशाची स्थिती आणि शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. तसेच भाषणाच्या शेवटी नरेंद्र मोदींनी वारंवार सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना आधीचे दाखले देत प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्यावरही टीका झाली. खूप काही बोललं गेलं. पण त्यानिमित्ताने मी तुमच्या उपयोगाला आलो याचं मला समाधान वाटलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोनाकाळात सर्वजण घरात होते. त्यामुळे निर्माण झालेला ताण, राग इथे मोकळा झाला असेल. आता तुमच्या घरातील वातावरण चांगलं राहिल. अशीच नेहमी चर्चा करत राहा. मोदी है मोका लिजिए, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर यापुढे 30 टक्के पगार आई-वडिलांच्या खात्यावर जमा होणार!

अबब!!! एका चुकीमुळं 50 लाख फॉलोवर्स असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं नाक झालं विद्रुप!

‘शरद पवार सुधारणांच्या बाजूने, मात्र…’; संसदेत नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

…म्हणून पोलिसांनी चक्क कोंबड्यांनाच पोलीस कोठडीत डांबलं!

आर. अश्विनचा नादच खुळा; अनिल कुंबळेचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या