Loading...

नरेंद्र मोदी म्हणतात…महाराष्ट्राच्या जनतेला दिलेलं ‘ते’ वचन मी पूर्ण केलं

भंडारा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भंडारातील साकोला येथे प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या एका वचनाची आठवण काढली. मराष्ट्राच्या जनतेने ते वचन विसरलं असेल पण मी विसरलेलो नाही, असंही ते म्हणाले.

आमच्या हाती सत्ता द्या तुम्हाला स्थिर सरकार व सशक्त नेतृत्व देईन, असं मी म्हणालो होतो. श्री देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने सक्षम नेतृत्व देऊन, मी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेलं वचन पूर्ण केलं, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

Loading...

यावेळी नरेंद्र मोदींनी  देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम नेतृत्व महाराष्ट्राच्या जनतेला लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जात राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 21 ऑक्टोबरला विधानसभेचे मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढल्याचं दिसून येत असून नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 9 सभा घेणार आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...