नवी दिल्ली | कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ते आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.
कोरोना प्रतिबंधक लसीसाठी देशाला आता जास्त काळ वाट पाहण्याची आवश्यकता नाही, असं नरेंद्र मोदी म्हणालेत. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक नियमांचं पालन करताना दुर्लक्ष करु नका, असं आवाहनही मोदींनी केलं आहे.
मागच्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष लसीकडे लागलं आहे. मी शास्त्रज्ञांची भेट घेतली आहे. लसीसाठी देशाला आता जास्त काळ थांबण्याची आवश्यकता नाही, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, लसीची किंमत ही जनस्वास्थ्याला प्राथमिकता देऊनच निश्चित केली जाईल आणि राज्य सरकार या निर्णयप्रक्रियेत सहभागी असेल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
…तर जेलमध्ये राहणं पसंत करेन- ममता बॅनर्जीं
“राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले”
केवळ मोदींना विरोध करण्यासाठी सर्वांची दुटप्पी भूमिका- देवेंद्र फडणवीस
राज ठाकरेंसोबत मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक!
“संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा शिवसेना तटस्थ, मग आता विरोध कसा?”