बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | व्होकल फॉर लोकलची भावना देशातील नागरिकांनी दृढ करण्याची गरज आहे. हे आपल्याला वाढवत राहायचं आहे. प्रत्येकजण नव्या वर्षात काही संकल्प करतो. यावेळी देशासाठी हा एक संकल्प आवश्यक करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी विविध विषयांवर भाष्य केलं.

आपण एक यादी बनवावी. दिवसभर आपण ज्या गोष्टी घेतो. त्यामध्ये नकळतपणे विदेशात तयार होणाऱ्या वस्तू तर घेत नाही ना? यासाठी त्या वस्तूची भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. ती वस्तू भारतात तयार होईल, यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन मोदी यांनी केलं आहे.

मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतूक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवलं, असं मोदी म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

एसटीचा प्रवास आता होणार अधिक वेगवान; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

“चंद्रकांतदादांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणजे देवेंद्र फडणवीसच”

धनगर आरक्षणावरुन जयंत पाटलांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

भाजपच्या काळातील विषय समित्या आणि अभ्यासगट बालभारतीकडून बरखास्त!

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More