Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीतून केलं ट्विट!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्क मराठीत ट्विट केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सहकारमहर्षि बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यानिमित्ताने मोदींनी मराठीत ट्विट केलं आहे.

मी उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून श्री बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. कृषी आणि सहकारक्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा, असं नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

देह वेचावा कारणी, असं बाळासाहेब विखे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचं नाव आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थिती लावणार आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

आपली कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप सुरूच आहे- शरद पवार

वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे केसी महाविद्यालयाने परीक्षा पुढे ढकलल्या; ‘या’ तारखेला होणार पेपर

नोटा, फोन स्क्रीनवर ‘इतके’ दिवस कोरोना व्हायरस टीकू शकतो, संशोधकांचा दावा

‘यांच्या बापाची पेंड आहे का?’; चंद्रकांत पाटलांची टीका

बीड जिल्ह्याचा विकास निधी बारामतीला गेलाच कसा?- प्रीतम मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या