बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“… त्यानंतर नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधानपद सोडतील”

नवी दिल्ली | देशातील महत्त्वाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. दिल्लीच्या सत्तेकडे जाणारा रस्ता अशी ज्या राज्याची ओळख असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपने पुन्हा एकदा बहुमत मिळवले आहे. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महामंडलेश्वर यतींद्र आनंद गिरी यांनी वक्तव्य केलं आहे.

ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्यवाणी केल्यास 12 वर्षे नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील. 12 वर्षे पंतप्रधान पद भूषवल्यानंतर मोदी राजकारणातून संन्यास घेतील. राष्ट्रवादाच्या मुद्याने मोदी पंतप्रधान पद सोडतील. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर एखादया योग्य व्यक्तीकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवतील, असं भाकित आनंद गिरी यांनी वर्तवलं आहे.

नरेंद्र मोदी हे एक आदर्श देशासमोर ठेवतील आणि राजकीय इतिहास घडवतील, असं वक्तव्य आनंद गिरींनी केलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान होऊन हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करावं, अशी इच्छा महामंडलेश्वर यतींद्र आनंद गिरी यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, देशात 2014 साली सत्तापरिवर्तन झालं. काँग्रेसचा पराभव करत भाजपने मित्रपक्षांसह देशात सत्ता मिळवली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा बहुमताने सत्तेत आले. 2024 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यातच आता 12 वर्षे पंतप्रधान राहतील, असं भाकित करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा…’; भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

‘रशियाला 10 दिवस युद्ध थांबवावं लागेल’; माजी लष्कर अधिकाऱ्यानं सांगितलं कारण

होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारची नवी नियमावली, वाचा काय आहेत नियम

Punjab New Chief Minister: भगवंत मान यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा; न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More