बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिखट आणि धारदार प्रश्न विचारा, पण उत्तरं देण्याची संधी द्या- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी विरोधकांना तिखट आणि धारदार प्रश्न विचरण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी उत्तर देण्याची संधीही द्या, असं म्हटलंय.

मी सर्व पक्षांना आणि खासदारांना हे आवाहन करू इच्छितो की, जास्तीत जास्त अवघड प्रश्न विचारा, धारदार, बोचरे प्रश्न विचारा मात्र सरकारला शांततेत, शिस्तबद्ध रितीने त्या प्रश्नांची उत्तरं देण्याची संधीही द्या. यामुळे लोकशाही आणि लोकांचा विश्वास अधिक बळकट होण्यास मदत होईल. तसंच विकासाची गतीही वाढेल, असं नरेंद्र मोदी म्हणालेत.

आतापर्यंत 40 कोटीहून अधिक लोक कोरोना विरोधात बाहुबली बनले आहेत. संपूर्ण जगाला या महामारीने घेरलं आहे. मानव जातीला घेरलं आहे. त्यामुळे संसदेत या संदर्भात चर्चा व्हावी. प्राधान्याने त्यावर चर्चा व्हावी. व्यवहारी सूचना याव्यात. त्यामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी नव्याने उभं राहता येईल. काही चुका असतील तर त्या दुरुस्त करता येईल, असं आवाहनही नरेंद्र मोदींनी केलं आहे.

दरम्यान, आपण बाहुवर व्हॅक्सिन घेतली आहे. बाहुवर व्हॅक्सिन घेतल्याने तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी बाहुबली बनण्याचा हा एकमेव उपाय आहे. बाहुवर लस घेणं हाच पर्याय आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेसचा मोठा निर्णय; पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर नवज्योतसिंह सिद्धू

“माझ्या वडिलांनी माझ्या स्वप्नांचा जीव घेतला, त्यांना तुरुंगात टाका”

“मुंबईकरांच्या जीवितहानीसाठी बेशरम शिवसेनावाले सोडून बाकी सगळी दुनिया जबाबदार”

“मी जगातील सर्व काश्मीरी नागरिकांचा ब्रँड अॅम्बेसिडर”

“फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More