बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अशोक चव्हाण ताठर माजी मुख्यमंत्री, गडी ऐकायलाच तयार नाही”

अहमदनगर | मराठा आरक्षणावरून अण्णासाहेब फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सरकार कमी पडतंय. आमचं खरं नुकसान मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख अशोकराव चव्हाण यांनी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे झालं आहे, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

सभागृहात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबद्दल चर्चा केली. मात्र, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अजित पवारांनी मराठा समाजाबद्दल एक शब्दही काढला नाही. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देणे गरजेचं आहे, असं नरेंद्र पाटील म्हणाले. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री असून ते किती ताठर आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी कुठल्याही मराठा क्रांती मोर्चा लोकांसोबत समन्वय साधला नाही. अशोक चव्हाण यांना खासदार छत्रपती संभाजी महाराज आणि विनायक मेटे यांच्यासह इतर समन्वयक वेळोवेळी भेटून सांगत होते. पण तरी गडी ऐकायलाच तयार नाही, असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाणांवर टीकास्त्र सोडलं.

9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला दिलेल्या 12 ते 13 टक्के आरक्षणाला स्थगिती मिळालीय. तसेच नवीन भरती करू नये या आरक्षणाच्या अंतर्गत त्याला देखील स्थगिती मिळाली. एकंदरच त्यांच्या योग्य पाठपुरावा न झाल्यामुळे मराठा समाजाला बॅगफूटवर यावं लागलं, असा आरोप नरेंद्र पाटलांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

…अन् अशाप्रकारे कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा…

पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा जागीच मृत्यू

“आमदारकीसाठी नव्हे तर शेतकऱ्याला योग्य दाम मिळावा म्हणून आंदोलन”

‘देवदूतच ठरला यमदूत’! पैसे नसल्याने डॉक्टरांनी चिमुरडीचं शिवलं नाही पोट अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More