देश

“शरद पवारांसारखे अनुभवी नेते चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत”

नवी दिल्ली | सर्व काही माहिती असूनही शरद पवारांसारखे अनुभवी नेते शेतकऱ्यांसमोर चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत, असा दावा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलाय.

शरद पवार यापूर्वी कृषी कायद्याचे समर्थक होते. त्यासाठी त्यांनी खूप मेहनतही घेतली होती. मात्र, आता शरद पवार ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत, ते पाहून मला आश्चर्य वाटत आहे, असं नरेंद्र सिंह तोमर म्हणालेत.

शरद पवार यांच्याकडे आता योग्य माहिती आली आहे. त्यामुळे ते यापुढे आपली भूमिका बदलतील आणि देशातील शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे फायदे आणि लाभ सांगतील, असा मला विश्वास आहे, असंही तोमर यांनी म्हटलं आहे.

नवीन कृषी कायद्यांमुळे बाजार समित्यांवरही परिणाम होणार नाही. याउलट, अधिक स्पर्धा निर्माण होईल तसेच सेवा आणि पायाभूत सुविधा निर्माण होतील. यामुळे दोन्हीही व्यवस्था कायम राहतील, असंही तोमर यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

RBIची मोठी कारवाई; महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा परवाना रद्द

माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो- तात्याराव लहाने

केंद्राची मोठी घोषणा, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार

धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त- इंदुरीकर महाराज

“मोदी सरकारने गांधीजींचा चष्मा घेतला, पण त्यांचा दृष्टिकोन घेऊ शकले नाहीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या