बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माजी मुख्यमंत्री सुज्ञान आहेत, मात्र…”; नाशिक पोलीस आयुक्तांचं देवेंद्र फडणवीसांना सडेतोड उत्तर

नाशिक | मंगळवारी सकाळपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची चर्चा सुरू झाली होती. नाशिक आणि पुणे पोलिसांची टीम रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. त्यानंतर नारायण राणे यांच्या अटकेच्या अटकली लावल्या जात होत्या. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला होता.

ठाकरे सरकारच्या दबावामुळे पोलीस अधिकारी काम करत असल्याचा आरोप फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला होता. तुम्ही स्वत:ला छत्रपती समजता का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना विचारला होता. त्यानंतर आता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी देवेंद्र फडणवीसांना सडेतोड उत्तर दिलंय.

माजी मुख्यमंत्री खूप सुज्ञान आहेत. त्यांना कायद्याचा अभ्यास आहे. त्यांना माझं काही चॅलेंज नाही. माझं ज्ञान थोडं आहे. माझ्या शिकवणीनुसार मी काढलेला आदेश चुकीचा असेल तर, संविधानाच्या 226 आणि 227 कलमानुसार न्यायालयात जाऊन शहानिशा करू शकता, असं पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी म्हटलंय.

दरम्यान, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मा न्यायसंगत आहे, असंही दीपक कुमार यांनीही म्हटलंय. प्रोटोकाॅलनुसार मंत्रीमहोद्यांनी आदरपूर्वक वागलं पाहिजे. शिस्त पाळली पाहिजे. मंत्रीमहोद्यांचा सन्मान झाला. या पुढेही करू, असंही दीपक कुमार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“वरूण सरदेसाई यांना ‘सरकारी भाचा’ घोषित केलंय का?”

“किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा करावा”

नारायण राणेंची पुन्हा न्यायालयात धाव, आता हे आहे कारण!

राज्यात आता राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग – नितेश राणे

देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More